Power by The Web Cloud Media

मतपेटी गाठण्याआधीच उत्सुकता; बिनविरोधी चर्चेला उधाण

कल्याण

पूर्वेतील पॅनल क्रमांक 18 अ (कचोरे, नेतीवली टेकडी, गावदेवी, नेतेवली–मेट्रोमॉल, शास्त्रीनगर) या प्रभागातून माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी, तर डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 26 क (म्हात्रे नगर, राजाजी पथ, रामनगर, शिव मार्केट, सावरकर रोड) येथून आसावरी केदार नवरे अशी भारतीय जनता पार्टीच्या दोन महिला उमेदवारांची नावे निवडणूक प्रक्रियेत पुढे आली आहेत.

या दोन्ही पॅनलमध्ये त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये राजकीय चर्चेला वेग आला असून, निकालाबाबत सकारात्मक अंदाज बांधले जात आहेत.

मात्र निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्पे अद्याप बाकी आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरच बिनविरोध विजयाबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचे निवडणूक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घडामोडीमुळे कल्याण आणि डोंबिवली परिसरात संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मतदानपूर्वीच अनुकूल स्थिती निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *