Power by The Web Cloud Media

कल्याण डोंबिवलीत ‘नवभारत साक्षरता’ परीक्षा

कल्याण

भारत सरकारच्या ‘नवभारत साक्षरता अभियान’ (FLNAT) अंतर्गत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे येत्या २९मार्च २०२६ रविवार रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे शहरातील असाक्षरांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

अभियानाची ठळक वैशिष्ट्ये

नोंदणी: २०२५-२६ या वर्षासाठी महापालिकेने २००० साक्षरांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आतापर्यंत 1781व्यक्तींची नोंदणी पूर्ण झाली असून उद्दिष्टा पर्यंत प्रतिसाद लाभला आहे.

परीक्षार्थी संख्या : आगामी 29 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण 1781परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.

तपशीलवार : यामध्ये 256पुरुष आणि 1525 महिला परीक्षार्थींचा समावेश आहे. महिला वर्गाचा या अभियानातील सहभाग अत्यंत उत्साहवर्धक आहे.

 

शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सरकटे तसेच प्रशासन अधिकारी भारत बोरनारे

महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त असाक्षर नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. केवळ अक्षरांची ओळखच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील मूलभूत संख्या ज्ञान आणि व्यवहार ज्ञान नागरिकांना मिळावे, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.

या चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिक्षण विभाग, शिक्षक आणि स्वयंसेवक पूर्णतः सज्ज झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *