पर्यायी वीजपुरवठ्यासह चार प्रमुख मागण्या
कल्याण, दि. ७ ऑगस्ट २०२६
मोहिली जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने मागील आठवड्यात कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना सुमारे ३६ तास पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर तसेच प्रभाग क्रमांक २७ मधील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
प्रभाग क्रमांक २७ चे नगरसेवक मंदा पाटील, सायली विचारे, महेश पाटील आणि अभिजीत थरवळ यांनी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
प्रमुख मागण्या
• मोहिली जलशुद्धीकरण केंद्रासाठी पर्यायी (Standby) वीजपुरवठ्याची तातडीने व्यवस्था करावी.
• शेवटच्या घरापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचण्यासाठी झोनिंग (Zoning) प्रणाली लागू करावी.
• प्रभागातील जुन्या व कमी व्यासाच्या जलवाहिन्या बदलून मोठ्या क्षमतेच्या नवीन पाइपलाइन टाकाव्यात.
• पाथर्ली परिसरासाठी स्वतंत्र नवीन पाणीवाहिनी उभारण्यात यावी.
प्रभाग क्रमांक २७ मधील टिळक नगर, गोग्रासवाडी, अंबिका नगर आणि पाथर्ली परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असून, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.













Leave a Reply